इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तरच परमेश्वर आपल्या पाठीशी असतो
परमेश्वरावर सर्व भार टाकून, आपल्या आवडी-निवडी फेकून देऊन, ‘त्याच्या’ तंत्रानें वागत असतांना कामे किती सुरळीत होतात! मनास सुद्धा किती मोकळे वाटते! अशा रीतीने आग्रह न ठेवता सबंध वेळ व्यतीत केल्यानंतर जणू देवाच्या कुशीत शांत चित्ताने तुम्ही झोपी जाता. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठता तेव्हा मन किती प्रसन्न असते! कशा विषयी धास्ती नाही, कशाची चिंता नाही, असंतुष्ट वासनांची ओढ नाही की कशाविषयी उतावीळ नाही. कारण आपण जे काही करणार आहोत ते आपल्या स्वतःसाठी नव्हे, आपले जीवन म्हणजे चंदनाप्रमाणे झिजण्यासाठीं आहे. सत्कर्माच्या पुष्पांनी परमेश्वरपूजा करण्यासाठीं ते आहे ही भावना असते. अशा भूमिकेत परमेश्वर सततचा आपल्या पाठीशी असतो. अशा समर्पित जीवनात ना धोका, ना चिंता, ना अस्वस्थता, ना दुःख. सर्व आनंदच आनंद!