इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
याविषयी विश्वास बाळगा
भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ अशा तिनही काळी ईश्वराचे सान्निध्य अनुभवण्यास शिका. हजारो वर्षे तो तुमचा साथी होता आणि पुढेही राहील याविषयी विश्वास बाळगा. म्हणूनच कार्य करतानाही भविष्याचा अथवा भूतकाळाचा विचार करू नका. तर काम करताना दर क्षणाला जागृत असा. हाच दिव्य मार्ग आहे या मार्गाने चालतांना कशाचीही भीती नको, यशप्राप्ती विषयी चिंता नको अशी वृत्ति धारण केली म्हणजे ईशकार्य करण्यासाठी आवश्यक ती शक्ति, ज्ञान आणि कर्म-कुशलता तुमच्या अंगी येईल.