इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
यापासून तुम्ही सुरक्षित रहाल
साधनेच्या दृष्टीने अनावश्यक व अनिष्ट भावभावना यांना दूर सारावयाचे असेल, तर इष्ट व शुभ अशा मन-तरंगांनी ते काम साध्य होऊ शकेल. इतरही पुष्कळ मार्ग असतील; परंतु सर्वात साधा, सोपा आणि सार्वकालिक मार्ग हा की आपल्या मनास शुभचितनात, पठणात अथवा सत्कार्यात गुंतवणे. काट्याने काटा काढल्याप्रमाणे हे आहे. सुविचार, सत् प्रार्थना, सत्कर्म, सद् वचन यांच्या समोर अशुभ व अपवित्र विचार टिकू शकणार नाहीत. मित्रांनो, उच्चतर विचारावर व जीवनावर चित्त स्थिर करा म्हणजे सामान्य पातळीवरील जीवनामध्ये उद्भवणाऱ्या काळज्या, भय, शोक इत्यादिपासून तुम्ही सुरक्षित रहाल.