इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
याचा कधीही विसर पडू देऊ नये
पालक व बालक आणि मालक व चाकर यांच्यातील संबंध आदर्श राहण्यासाठी आपणावरही काही जबाबदारी असते, याचा कधीही विसर पडू देऊ नये. हे संबंध जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि स्नेहाचे असले पाहिजेत. पालकांनी व मालकांनी आता अधिकाराची जाणीव विसरून जबाबदारीची जाणीव राखली पाहिजे. दुसऱ्याला आज्ञापालन धाकाने करण्यास लागता कामा नये. तुमची आज्ञा पाळण्यात दुसऱ्यांना आनंद वाटला पाहिजे. दुसऱ्यांच्या गुणांची कदर तुम्हाला असेल व दुसऱ्यांवर पूर्ण विश्वास तुम्ही टाकू शकत असाल, तर तुमची इच्छा मानण्यात कोणासही आनंद वाटेल. त्यांच्या कामावर, वागण्यावर ‘नजर’ ठेवण्याची कल्पना टाकून द्या. मुक्त कर्माचा आनंद त्यांना घेऊ द्या.