इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
या गोष्टी सोप्या आहेत?
अडचणीत व संकटात कोंडल्या गेलेल्या मनाला समर्पणाचा धडा लवकर मिळतो. अशा वेळी मन आपल्या इच्छा, जिवाभावाच्या संबंधीजनांची आसक्ति व स्वार्थ सर्व कांही परमेश्वराच्या हाती सोपविते. खरोखरच अशा काही वेळा असतात, जेव्हा काही कृती करण्यापेक्षा स्वस्थ राहणेच हवे असते. अर्थात ही गोष्ट सोपी नाही. तुम्हाला वाटते का की, भावनांचे आवेग आवरणे, वासनांना लगाम घालणे, निराशा फेकून मोकळे होणे, दुःखद विचारांना परस्पर दूर लोटणे, विरहाचा विसर पाडणे व नित्याच्या कर्तव्यकर्मांस उत्साहाने व आनंदाने हात घालणे या गोष्टी सोप्या आहेत? नाही. पूर्वपदावर येणे व पदस्थ राहणे मोठ्या सामर्थ्यांचे काम आहे. हे सामर्थ्यं हरप्रयत्नानें मिळवा.