इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
या तीन गोष्टी आवश्यक असतात
ईश्वराकडून येणारी ‘शक्ती’ ग्रहण करण्याची क्षमता येण्यासाठी आणि त्या शक्तीला तुमच्या माध्यमातून बाह्य जीवनातील गोष्टींमध्ये कार्य करू देण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक असतात…
(१) अचंचलता, समता :– घडणाऱ्या कोणत्याही घटनेने विचलित न होणे. मन स्थिरचित्त आणि दृढ राखणे. घडणाऱ्या घटनांकडे हा विविध शक्तींचा खेळ आहे या दृष्टीने पाहणे. आणि स्वतः मनाने समचित्त राहणे.
(२) असीम श्रद्धा :– जे सर्वोत्कृष्ट आहे तेच घडेल ही श्रद्धा बाळगणे. पण त्याबरोबरच, व्यक्ती जर स्वतःला खरेखुरे देवाचे साधन बनवू शकली तर, त्याचे फळ _’कर्तव्यम् कर्म’_ अशा स्वरूपाचे असेल. आणि
(३) ग्रहणशीलता :– ‘ईश्वरी शक्ती’चा स्वीकार करण्याची व तिचे अस्तित्व अनुभवण्याची व त्यामध्ये ‘भगवती’ची उपस्थिती अनुभवण्याची ताकद म्हणजे ग्रहणशीलता. तसेच व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याची मुभा त्या ‘ईश्वरी शक्ती’ला देऊन, तिला कार्य करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय.