इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
विशाल प्रेम मिळावे म्हणून
प्राणिमात्रास तुमच्या प्रेमाची सावली लाभू द्या. असे विशाल प्रेम मिळावे म्हणून देवाची नित्य प्रार्थना करीत जा. या प्रेमाबरोबरच शालीनता, नम्रता आणि धीरवृत्ती यांचाही लाभ तुम्हाला होईल. या गोष्टी स्वत:ला व इतरांनाहि लाभाव्या अशी तुम्ही सतत इच्छा बाळगावी. कारण अशानेच ईशसान्निध्यात व त्याच्याशी संयुक्त अशा स्थितीत तुम्ही सतत राहू शकाल.
जे जे मंगलकारक व सौख्यदायक असेल, ते ते प्रत्येकाला मिळावे अशी इच्छा बाळगून त्या दिशेने आपापल्या शक्तीप्रमाणे प्रयत्नशील रहाणे हा स्वभावधर्म दैवी होय. कारण परमेश्वराची जगाकडे पहाण्याची व वागण्याची भूमिका हीच असते; आणि म्हणून या अशा स्वभाव- गुणानें संपन्न असे साधक त्यास अति प्रिय होतात.