इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…त्यावेळी तुम्हाला स्वत:चे दोष दिसत नाहीत
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या दोषांची जाणीव नसणे, हे कोठेतरी अप्रामाणिकपणा असल्याची खूण आहे. आणि सामान्यतः तो अप्रामाणिकपणा हा मन-प्राणात दडलेला असतो. जेव्हा तो ठरवितो की तो काम करणार आहे… त्याचे सारे प्रयत्न आणि ऊर्जा, तो काम पूर्ण करण्यासाठी खर्च करणार आहे, तेव्हादेखील कोठेतरी काहीतरी दडून राहिलेले असते… अशी एक अपेक्षा असते की, सर्व गोष्टी चांगल्या होतील आणि त्याचे परिणाम अनुकूल असतील. आणि ही अपेक्षाच प्रामाणिकपणाला पूर्णपणे झाकून टाकते. कारण ही अपेक्षा अहंजन्य, वैयक्तिक बाब असते आणि ती प्रामाणिकपणाला संपूर्णपणे झाकून टाकते. त्यावेळी तुम्हाला स्वत:चे दोष दिसत नाहीत.
परंतु, एखादी व्यक्ती पूर्णपणे प्रामाणिक असेल तर, ती जेव्हा एखादे अयोग्य काम करू लागते त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी, अगदी स्पष्टपणे – आक्रमकपणे नव्हे तर, अगदी स्पष्टपणे, अगदी नेमकेपणाने तिला जाणवते की, “नाही, हे काम करता कामा नये.” आणि व्यक्तीमध्ये अजिबात आसक्ती नसेल तर व्यक्ती ती गोष्ट करणे लगेचच थांबविते, अगदी त्वरित ती ते काम थांबविते.