इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील
समुद्र ज्याप्रमाणे वाळू आणि केरकचरा याचे ढीग आणून किनाऱ्यावर फेकतो, त्याप्रमाणे कोणाच्या दुष्ट, वक्र स्वभावामुळे तुम्हावर कांही शेकले गेले, तर त्यांत काय बिघडले? कारण, या जगात अशाही नद्या दुथडी भरून वहात आहेत की, ज्यांच्या सुमधुर जलाने तुमचे हृदय मधुर होऊन राहील. शांत व स्थिर मनाने देवावर सर्व भार टाकून, त्याच्या इच्छेने जे जे काही होईल ते ते स्वीकारण्याचे व्रत घेण्याने त्या दिव्य नद्यांचा शोध तुम्हाला लागेल. या समर्पणवृत्तीच्या गंगेत स्नान केल्याने तुम्हाला शांती आणि आनन्द यांचा लाभ होईल. या कठोर व मत्सरी जगाकडून त्रास होत असतांनाही ही शांती तुमच्यापासून दूर जाणार नाही. तरी देवासंबंधी आणि स्वतःसंबंधी आपले आजचे कर्तव्य काय आहे याचा शांतपणे विचार करून दिवसभर कर्तव्य परिपूर्ती करीत रहा. समर्पणभावाने सर्व भावना व शक्ती कामास लावा. असे केल्यावर मग कोणी मदत करो वा न करो, कोणी संमती देवो वा न देवो, तुमची प्रगती अखंडपणे चालू राहील.