विचार पुष्प – तीच खरी ईश्वरी कृपा
जगातील संकट व कसोटीचे प्रसंग देव तुम्हावर येऊ देणार नाही, पण त्यासाठी त्याची भक्ति करा असा खोटा दिलासा कोणत्याही संताने आजवर दिलेला नाही. त्याची कृपा होईलच. कारण संकटातही आपले चारित्र्य निष्कलंक राखण्याचे जे धैर्य आपणास मिळाले तीच खरी ईश्वरी कृपा आहे. आणि हे खऱ्या भक्तास माहित असते. अपमान, निंदा यांचा वर्षाव झाला, कोणी दुखवले तरी ती ईश्वराचीच कृपा आहे असे ते मानतात. कारण ‘देव-कर्मात व सत्प्रवृत्तींत’ स्थिर राहण्याचे बळ त्यामुळे त्यांना मिळत असते. ही भूमिका प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वराची सतत प्रार्थना करीत जाणे हाच त्याला एक उपाय आहे.
Vichar Pushpa Tich Khari Ishwari Krupa