इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तेव्हा तुमचा मार्ग उजळेल
समजा, सायंकाळच्या वेळी तुम्हाला तुमच्या नापसंतीची, अवघड, यशाविषयी साशंकता असलेली कामगिरी करावयाची आहे. हरकत नाही. पण त्यासाठी तुमची सकाळ व दुपार तुम्ही सायंकाळच्या सावलीने झाकाळू का देता? दर घटकेला, हाती असलेले कर्तव्य-कर्म पार पाडा आणि त्याच्या फलाचा उपभोग घेत घेत पुढे चला. ज्यावेळी नियोजित अवघड कामगिरीचा क्षण येईल, त्यावेळी तुमचा मार्ग अज्ञात प्रकाशाने उजळलेला तुम्ही पहाल आणि ती कामगिरीही तुमच्या हातून सहजासहजी पार पडून जाईल. वर्तमानातील कामगिरीवर सर्व शक्ती एकत्रित करून, ती पार पाडण्याच्या कामी जराही कसूर होऊ न देण्यासाठी जपा. त्यायोगे तुमची बुद्धि, विचार-शक्ति, शरीर वगैरे सर्व साधने अशी कांही ताजीतवानी व चकचकीत राहतील की, अवघड कामगिरी तुम्ही केव्हा उरकून टाकलीत ते कळणारही नाही. योग्य असे योग्य क्षणी बोलले जाईल, केले जाईल व योग्य तो परिणाम होईल.