इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तेव्हा कळते की जीवन म्हणजे
जरा सबुरीने घ्याल तर लक्षात येईल की, आपल्याविरुद्ध घडलेली गोष्ट, लहानसहान निराशा प्रसंग, कांहीं प्रसंगीं सोसाव्या लागलेल्या यातना, म्हणजे विपरीत वेष घेऊन आलेले ईश्वरी आशीर्वादच आहेत. या दृष्टीने पाहता, आपला या भूलोकींचा संचार म्हणजे स्वर्गातीलच विहार ठरेल.
दुसऱ्याच्या स्वभावामुळे खाव्या लागणाऱ्या कोपरखळ्या, अरुंद जागी अडवून जगाने दिलेले निंदेचे व संकटाचे तडाखे, प्रकृतीचे आपणाविरुद्ध बंड, अनारोग्य, दिवसाकाठी घडणारे लहानसहान अपघात, यांना आपल्या जीवनात स्थान आहे. आणि हे ध्यानी येताच आपण निश्चल शांतीप्रत पोहचतो व आपल्या अंतःकरणास विश्रांतीसुख लाभत. तेव्हा कळते की जीवन म्हणजे चढणीवरून सुळक्यावर पोहचविणारा प्रवास नाही. सर्वत्र ईश प्रेम बहरलेले दिसते. ही उच्चतर दिव्यदृष्टी मिळवा.