इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर तुम्हाला निश्चितच यश मिळेल
व्यक्तीला पुन्हा पुन्हा सांगावे लागते, लागेल की पूर्णपणे प्रामाणिक व्हा. स्वतःला फसविण्याचा कधीही प्रयत्न करू नका, असे कधीही म्हणू नका की, ‘मला जे जे करता येण्यासारखे होते ते सारेकाही मी केले आहे.’ उद्या जर तुम्ही यशस्वी झाला नाहीत, तर त्याचा अर्थ असा होईल की, जे करण्यासारखे होते ते सारे तुम्ही केले नव्हते. कारण तुम्हाला जे जे करता येणे शक्य होते ते ते ‘सारे’ तुम्ही खरोखरच केले असते, तर तुम्हाला निश्चितच यश मिळाले असते.