इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर तुमची वाटचाल सुरक्षित
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा ! तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर ‘योगा’ची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ‘ईश्वरा’बरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबात शक्यताच नसते. तुम्ही जर विनम्र असाल आणि अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ‘ईश्वरा’चा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही या ‘मार्गा’वरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकता.