इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर सतत तुडुंब रहाल
तुमचे हृदय परमेश्वराच्या भक्तीने, सान्निध्याने व सतत स्मरणाने तुडुंब राहील तर मग त्याला स्वर्गात, पृथ्वीवर अथवा अन्य कोठेतरी शोधत बसण्याची गरज राहणार नाही. या विश्वाच्या अस्तित्वाचे कारण, गाभा, प्राण म्हणजेच परमेश्वर हे ओळखा.
कोणत्याही स्थल-कालाहून भिन्न असा त्यास पाहू नका. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वस्तूत, प्रत्येक घटनेत तोच विद्यमान् असल्याचा अनुभव क्षणोक्षणी घेण्याचा प्रयत्न करा. त्यायोगे परमेश्वराचे निरंतरचे व नित्य नवे असे दर्शन तुम्हास घडत राहील.
प्रत्येक नव्या क्षणात, नव्या घटनेत त्याचेच दर्शन, पूजन व स्तवन तुम्ही करू शकाल. या सर्वस्थित परमेश्वराशी तुम्ही पूर्णपणे सततचे संलग्न रहाल.