इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तरीसुद्धा निराश होऊ नका
घरगुती, सांसारिक अडीअडचणींना जर तुम्ही शांतपणे, धीर धरून व दयाळू, उदार वृत्ती ठेवून तोंड दिलेत, तर त्यायोगे तुमचे चारित्र्यबळ वाढण्यास मदतच होईल. नेहमी हे लक्षात ठेवा व वारंवार स्मरण करा की तुम्ही कोठेही असलात, काहीही करत असलात, सावध असलात वा कशात गुंतलेले, रमलेले असलात तरी परमेश्वर निरंतर तुमच्याकडे कृपादृष्टीने पहात राहिला आहे. तो पाहतो आहे, तुमचे वर्तन त्याच्या संकल्पाशी जुळते मिळते आहे की नाही. म्हणून सर्वच प्रसंग, घटना तुम्ही त्याच्या चरणी अर्पण करीत जा.
समजा कधीकाळी उतावीळ झालात आणि हातून काहीतरी घडून गेले, तरीसुद्धा निराश होऊ नका. तर शक्य तितक्या लवकर पूर्वीची शांत व निश्चिंत वृत्ती परत मिळविण्याचा प्रयत्न करा.