इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर आपल्याला ईश्वराचे संरक्षण लाभेल
आपण जेव्हा ‘ईश्वरा’च्या निकट संपर्कात असतो, जवळ असतो तेव्हा आपल्याला जे साहाय्यकारी होईल किंवा जे थेट मार्गदर्शन करेल किंवा जे आपल्याला संचालित करेल असे संरक्षण आपल्याला मिळू शकते. त्यामुळे साऱ्या अडचणी, सारे दुःखभोग वा धोके बाजूला सारले जातात, असे नव्हे; परंतु ते आपल्याला त्या सर्व गोष्टींमधून सुरक्षित घेऊन जाते आणि त्यातून बाहेरही काढते… तुम्ही जेव्हा ‘परमेश्वरीय शांती’चा विचार करता तेव्हा ती एखाद्या आवाहनासारखी कार्य करते आणि तुम्ही त्या शांतीचा जेवढा अधिक विचार करता, तेवढे तुम्ही त्या शांतीने स्वत:ला अधिक परिवेष्टित करून घेता, आणि ते सर्वात शक्तिशाली असे ‘संरक्षण’ असते.. . आपण ‘ईश्वरा’प्रत समग्रतया आणि प्रामाणिकपणाने आत्मदान करूया म्हणजे मग आपल्याला त्या ‘ईश्वरा’चे संरक्षण लाभेल.