इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर चुका घडत नाहीत
तुम्ही तुमचे कर्म ‘ईश्वरा’च्या चरणी पूर्ण प्रामाणिकपणे अर्पण केलेत तर, तुमचे कर्म हे ध्यानाइतकेच महत्त्वाचे ठरेल… तुम्ही प्रामाणिक राहा, मग तुमच्या चुका हजार वेळासुद्धा सुधारण्याची भगवंताची तयारी आहे… जेव्हा जेव्हा एखाद्या ठिकाणी प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तेथे तुम्हाला साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच. तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ‘ईश्वरी’ कृपा तेथे असतेच आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.