इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर अवर्णनीय आनंद भरून राहील
विविध कष्टांमुळे नव्हे, तर मनुष्याने आपल्या मनाला लावून घेतलेल्या नाना काळज्या व विवंचना यामुळे तो परमेश्वराच्या शाश्वत कृपेला पारखा झालेला दिसतो. काही काम करावयाचे असो, माणूस त्यानंतरच्या फळांचा, यशापयशाचा विचार करून स्वबुद्धी व कौशल्य यांना आच्छादून टाकतो.
कोणत्याही कामास लागण्यापूर्वी व मध्येही मधून मधून स्तब्ध व्हा, शांत चित्त ठेवा व प्रार्थनावृत्ती राखा. आणि पुन्हा काम हाती घ्या. अशा रितीने केलेले काम ईशपूजन ठरेल. कारण मानवाच्या कर्माचा स्वामी, मार्गदर्शक हा त्याच्या अंतःकरणी गुप्त रूपाने सतत बसलेला आहे. त्याच्याशी सतत संयुक्त राहण्याचा अभ्यास दृढ झाला, म्हणजे, सर्वत्र त्याचेच दर्शन व सर्वत्र त्याचाच ध्वनी ऐकू येऊ लागेल व मनात, अंतःकरणात व देहात अवर्णनीय आनंद भरून राहील.