इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर असा अनुभव येईल
स्वतःच्या मनातील विचार दूर सारून शांत व्हा. जरा वेळाने हळूच काही विषयाकडे, कार्याकडे तुमचे मन आपोआप वळलेले तुम्हाला दिसेल. तेव्हा त्यात कल्पनांचे व पूर्वपरिचित विचारांचे मिश्रण होऊ देऊ नका. त्यावेळी जे काही अभावितपणे तुमच्याकडे येईल ते देवाकडून आलेले आहे असे समजा. त्याबरोबरच ते पूर्णतेस नेण्याचे बल व आवश्यक ते ज्ञानही तुम्हास मिळेल.
अनेक संकटे, अडचणी व कठीणता यांना तोंड देत पुढे जाण्यास लागणारी धीरगंभीर वृत्तीही लाभेल. तुमची भावना दृढ व श्रद्धा अचल बनेल. म्हणून क्षणोक्षणी स्वतःचे विचार, आकांक्षा, मनाची धावपळ, वासना, वृत्ती, कल्पनातरंग यांपासून अलग होऊन तुमच्या ठिकाणच्या दिव्यांशावर लक्ष केन्द्रित करा. तेथेंच सुस्थिरपणे राहू शकलात तर तुमच्यात बल संचरेल.
परमेश्वर मदत करण्यासाठी सतत सन्निध असल्याचा अनुभव येईल.