इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर आनंदाचा लाभ मिळेल
कोणतेही काम हातात असताना चित्तवृत्ती शांत व स्थिर राखत जा. कोणतेही काम जलदीने पुरे व्हावे म्हणून घाईघाईने करणे मुळीच योग्य नाही. उलट, योग्य तेवढ्याच गतीने व संथ भावाने हातातले काम करण्याचा अभ्यास ठेवा. त्यायोगेच तुमची शांती अढळ राहील आणि कोणत्याही कर्मातून यशस्वी वा अयशस्वीसुद्धां आनंदाचा लाभ तुम्हाला होऊ शकेल.
विश्रांत व उन्मीलित (open) अवस्थेत राहून प्रतीक्षा करीत रहा.
परमेश्वर तुमचा धन्वंतरी होईल व तुम्हाला आरोग्य, उत्साह व सामर्थ्य देईल.
तुमच्या मनास कर्मरत असताही शांति-सागरात डुंबता येईल.