विचार पुष्प – लहान-मोठे संकट आल्यास….
अगदी किरकोळ अथवा मोठे दुःख किंवा संकट तुमच्यावर येते तेव्हा त्यामागेही ईश प्रेमच उभे असते. त्याच्या प्रेमातूनच तुमच्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांचा उगम असतो. असे हे ज्ञान तुमच्या मार्गावर तुमचें मार्गदर्शक असेल, तर मग देवाने दिलेल्या सुखांपेक्षा अशारीतीने झालेला ईशप्रेमाचा अविष्कारच तुम्हाला अधिक मोलाचा वाटेल.
तुमचे पोट अथवा बोट दुखत आहे, थंडी वाजत आहे, भुकेने व तहानेनें व्याकुळ झाला आहांत, कोणी कृतीनें वा शब्दानें तुम्हांस दुखवीत आहे, तुम्हांवर दुःख व निराशा आणणारे प्रसंग घडत आहेत, तरी याच प्रसंगी देवावर भार टाकून निश्चित राहण्याचा अभ्यास करता येतो. हे ध्यानी धरून तो अभ्यास तुम्ही केला तर जीवनातील सर्व भेदाभेद लयास जाऊन त्यात केवळ समाधानच भरून राहील.