इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
शहाणपणा म्हणजे काय?
‘मनुष्य स्वतःचें सुदैव वा दुर्दैव स्वतः घडवीत असतो,’ ही म्हण सर्वमान्य दिसते. स्वतःच्या शहाणपणाच्या कृत्यांनी सुदैव व मूर्खपणाच्या कृतींनीं दुर्दैव ओढवते, असा त्याचा आपण अर्थ करतो. पण शहाणपणा म्हणजे काय? कांहींही घडो, तें देवाकडून आलेले आहे या भावनेने त्याचा स्वीकार करणे व त्यायोगे त्यातील अनिष्टपणा नष्ट करून टाकणे याचेच नाव शहाणपण. आणि कांहीही घडो, ते कोणीतरी दुसऱ्याने चांगल्या किंवा वाईट हेतूने घडविले आहे या भावनेने स्वीकारणे. ज्याने ते घडविले त्या व्यक्तीची खुषमस्करी करणें किंवा त्याची भीति बाळगणे हाच मूर्खपणा. या दृष्टीनें मनुष्य स्वतःच दुर्दैव व सुदैव घडवितो हे खरेच आहे.