इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
सर्व त्रासाचे मूळ
या जगात सर्व त्रासाचे मूळ आपले मनच आहे. सभोवतालच्या परिस्थितीशी, माणसांशी, घटनांशी, हवामानाशी, कशाशीच त्याचे जमत नाही. त्याच्याशी सुसंवादित्व राखता न आल्याने स्वतः सुसंवादार्थ प्रयत्न न करताच ते मन दुसऱ्याविषयी कुरकुरू लागते.
जे आपणासमोर आले आहे ते पवित्रच आहे, अशी मनाने जर धारणा केली, तर व ती अटळ राहिली, तर सर्वकाही दुःख-कष्ट, काळज्या कुठच्या कुठे पार नाहीशा होऊन जातील. प्रचंड खडकाप्रमाणे कोणत्याही वादळात मनुष्य धीर गंभीरपणे स्थिर राहू शकेल. मनाची जशी धारणा असेल तसा त्याला जगाचा अनुभव येईल. म्हणूनच मन प्रसन्न व संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करा.