इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्रामाणिकपणा आणि निष्ठा यातील फरक
प्रामाणिकपणा आणि निष्ठा यांमध्ये फरक आहे. प्रामाणिक नसताना एकनिष्ठ असणे, आणि त्याच्या उलट, म्हणजे, एकनिष्ठ नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. अशा काही व्यक्ती असतात, ज्या एकनिष्ठ तर असतात पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव असतो. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही एकनिष्ठता नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा येतो असे होत नाही. पण हे स्पष्टच आहे की, सचोटी, ऋजुता, एकनिष्ठता आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत असते…. एखादी व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती पूर्ण प्रामाणिकपणाने वागू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते.