इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर कधीही पश्चात्तापाचा प्रसंग येणार नाही
जेव्हा काही एक काम आपणास करायचे असेल वा एखाद्या प्रसंगाला तोंड द्यावयाचे असेल तेव्हा तुम्ही त्या सर्वांचा उच्चार तुमच्या देवतेसमोर करून मार्गदर्शनासाठी अंतःकरणपूर्वक प्रार्थना करीत जा. देवावर त्या सर्वांचा भार टाकून निःशंक मनाने व सर्व शक्ति आणि भाव एकत्रित करून हाती घेतलेले काम करू लागा.
नुसत्या कामाचाच नव्हे, तर तुमच्या स्वतःचाही भार इष्ट देवतेवर टाकून कार्यरत रहा. म्हणजे कधी दुःखाचा वा पश्चात्तापाचा प्रसंग येणार नाही. संकटे तुम्हाला देवाकडे धावावयास प्रवृत्त करतात. प्रार्थना तुमच्या संकटांना तुमच्यापासून दूर पळवून लावतात. प्रार्थनेचा महिमा अपार आहे, अगाध आहे.