विचारपुष्प – दृढसंकल्प
जगासंबंधी, देशासंबंधी, स्वत:च्या घरासंबंधी, स्वतःच्या बागेसंबंधी तुमच्या योजना असतात, परंतु ‘स्वतः संबंधी’ योजना तुम्ही तयार करीतच नाही. देश, धंदा, प्रपंच यांसंबंधींची अंदाजपत्रके तुम्ही तयार ठेवता पण स्वतःसंबंधी? जीवनधर्माचे तुम्हांला अज्ञान असते; तुम्ही आजाराला सहज बळी पडता; अशक्तपणा येतो आणि शेवटी तुम्ही हे जग सोडून जाता.
तुम्ही जीवनासंबंधी योजना आखा. जे तुम्ही ठरविता तेच तुम्ही मिळविता, जें इच्छिता ते प्राप्त करता, ज्याचा विचार करता ते लाभते, ज्याविषयी संकल्प करता ते ते पूर्णतेस जात असते. दीर्घायुष्य, सुदृढ आरोग्य, मोठी सामर्थ्ये, यशस्विता व संपूर्ण आनंद यांसंबंधी रोज दृढसंकल्प करीत जा : “मला शतायुष्य लाभो, शंभर वर्षे दृष्टि लाभो, शंभर वर्षे श्रवण घडो, शंभर वर्षे वाणी शुद्ध राहो, जीवनानंद शंभर वर्षे मिळो. अपराजित, अजिंक्य जीवन प्राप्त होवो.”
(संकलित)
Vichar Pushpa Part1 Drudha Sankalp