इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
नव्या वर्षाचा संकल्प
नववर्षाच्या जन्माबरोबरच आमच्या चेतनेचा, जाणिवेचा नवा जन्म होऊ दे. चला, भूतकाळाला मागे टाकून आपण ज्योतिर्मयी अशा भविष्याकडे वेगाने वाटचाल करू या.
हे परमेश्वरा, आमच्या अंतरंगात जे काही बनावट, मिथ्या, दिखाऊ आणि अनुकरणाच्या मागे लागलेले आहे, ते सारे आम्ही तुलाच अर्पण करतो. ते सारे आमच्यातून निघून जाऊ दे. जे पूर्णतः सत्य, निष्कपट, ऋजु आणि पवित्र आहे ते आमच्या अंतरंगात उदय पावू दे, स्थिर राहू दे.
(संकलित)