इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
नक्की असा अनुभव येईल
मनात एखादा त्रासदायक विचार शिरून त्रास देऊ लागला, त्याचा जोरही बराच असल्याचे तुमच्या ध्यानी आले, तरी त्याच्या सामर्थ्यावर मुळीच विश्वास ठेवू नका. कारण, तुम्ही न त्रासता, शांत चित्तानें त्याकडे नुसते पाहू लागलात तर थोड्या वेळात तो विचार क्षीण होऊन आपोआप कोठल्याकोठें विरून जातो असा अनुभव येईल. परमेश्वर तुमच्यामध्यें काय काय घडवीत आहे, रचना करीत आहे याची तुम्हांला कल्पनाच नाहीं. अशा स्थितीत तुमच्यामध्ये जे जे काही घडत असलेले तुम्हाला दिसेल, ते पाहून तुम्ही गांगरून जातो कामा नये. नुसती निरीक्षकाची भूमिकाच तुमच्या आंतरिक प्रगतीस उपकारक ठरेल.