इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…म्हणजे तुम्ही जगन्मित्र ठराल
देवाची इच्छा आहे प्रत्येकाने व्हावे थोडेसे ममताळू, प्रामाणिक आणि सर्व दिवस आनंदी.
व्हावे थोडेसे दयाळू, प्रेमळ आणि लहान बालकाप्रमाणें श्रद्धाळू.
व्हावे सभ्य, गोड आणि परोपकारी.
असावे कठीण प्रसंगीही आनंदी, न्यायी व देवास साक्षी ठेवून सत्यप्रिय.
व्हा असे, म्हणजे तुम्ही जगन्मित्र ठराल.
तुम्ही पैसा किती मिळविता, कपडे कसे व कोणते घालता, कोणते कौशल्य दाखविता, यावर काहीही अवलंबून नाही.
तुमचे स्मितवदन, डोळ्यातील शुद्ध आनंदाची चमक आणि अडचणीत मदत करण्यासाठीं धावणारे व्यापक हृदय पाहून सर्वांना तुमच्याविषयों आपुलकी वाटते.
तुमची एकंदर चालचलणूक, शेजाऱ्यांशी संबंध, तुमची कार्यकुशलता आणि खेळकर वृत्ती व जे जे कोणी भेटेल त्याविषयी सद्भाव बाळगणारे तुमचे मन व अतूट धैर्य, यामुळे तुम्ही सर्वांचे जिवलग होता.