इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
मनाची हीच भूमिका सतत राहिली पाहिजे
नम्रता, अलिप्तता, सरलता, शांतचित्तता यांच्या योगाने काय होते? आपणासंबंधी परमेश्वराची काय इच्छा आहे हे जाणून घेण्यास अनुकूल अशी शांति, मनःस्वास्थ्य प्राप्त होते. स्वतःसंबंधी जरुरीपेक्षा अधिक विचार करण्याचे आपण जर सोडून दिले, स्वतःचे नव्हे, तर नेहमी दुसऱ्याचे कल्याण प्रथम पहावयाचे असे केले, सर्व घटना परमेश्वरच घडवीत आहे या दृष्टीने त्याकडे पाहून त्यांचा नम्र भावनेने स्वीकार केला… तर मधून मधून, जरूर असेल तेव्हां तेव्हां असे कांहीं विशेष क्षण येतील की, जेव्हा परमेश्वराचा स्पष्ट आदेश व इच्छा आपल्या कानी येईल. एका धर्मियांच्या प्रार्थनेत एक ठराविक क्रिया असते. ते कानाला हात लावून आंतून काही ऐकल्यासारखे करतात. या क्रियेचें फार महत्त्व आहे. आपल्या मनाची हीच भूमिका सतत राहिली पाहिजे.