इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तर मन विचलित होत नाही
खऱ्या श्रद्धेचा साधक कोणत्याही परिस्थितीत सुरक्षितच असतो. कारण सर्वच प्रसंगांकडे तो साधनादृष्टीनें पहात असल्याने अनुकूल काळी तो उच्च दिशेने दृष्टी टाकून वर चढत राहतो. प्रतिकूल काळी नम्रतेने ईश्वरावर सर्व भार टाकून अविरोध-वृत्तीने मार्ग चालत राहतोच. त्यावेळी त्याची श्रद्धा, शरणभाव यांना तेज चढते. प्रकाश व अंधार दोन्हीकडून त्याच्या साधनेस साह्यच होते. म्हणून कसल्याही प्रसंगीं श्रद्धावान् साधकाचे मन विचलित होत नाही व आनंदी वृत्ती मावळत नाही.