इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
महापुरुषांचे वेगळेपण
पूर्ण निःस्वार्थी, निरहंकारी व परहितकारी असे महापुरुष; दुसऱ्यांच्या कल्याणार्थ स्वतःचा प्राणसुद्धा पणाला लावतील असे त्यागी वीर पुरुष ही मानवांतील उच्च कोटी होय.
स्वतःस नुकसान पोहचू न देता व अखेरीस द्रव्यलाभ व कीर्तिलाभ आहे असे पाहून परोपकार करणारांची दुसरी कोटी.
स्वसुखार्थच जगणारे व काही कर्म करणारे. प्रसंग पडला, तर दुसऱ्याची हानी झाली तरी स्वसुखात अंतर पडू नये यासाठी झटणाऱ्यांची तिसरी कोटी.
केवळ शौक म्हणून दुसऱ्यांची हानी करून त्यांत आनंद घेणारे व त्यांतच जीवनाची इतिकर्तव्यता मानणारे हा हीन, अधम प्रकार.
उच्चकोटीस चढण्याचा आपण दीर्घ प्रयत्न करूं या.