विचार पुष्प
मग आपल्याकडे काय कमी आहे?
दुसऱ्याप्रमाणे विशेष बुद्धिमत्ता अथवा अद्भुत असे आध्यात्मानुभव नसले म्हणून काय झाले? त्यासाठी वैषम्य व हेवा काय म्हणून वाटावा ? कारण प्रेमळ दृष्टि, सहानुभूतीची मदत, दयापूर्ण व उत्साही शब्द, इतरांना मदत करण्याची तत्परता, स्वावलंबनाची उमेद व उरक या गोष्टी जवळ आहेत ना. मग आपल्याकडे काय कमी आहे? बुद्धिमत्ता, विद्वत्ता व आध्यात्मिक अनुभव यांच्या माध्यमातून शेवटीं हेच सद्गुण संपादावयाचे आहेत ना? मग जे कांहीं सद्गुण जवळ असतील त्यांचाच योग्य वेळी , योग्य रीतीनें , पावलोपावली उपयोग करावा. त्याचें फळ ईश चरणी अर्पण करीत राहावे. अखिल जीवन म्हणजेच योग आहे. भक्ति आहे. यज्ञ व पूजन आहे. ही तुमची नित्याची साधनाच आहे, असे मानून त्यानुसार आपल्या जीवनाचा रंग पालटून टाकावा.