इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
तुमच्यावर कोणताही प्रसंग येवो, हे निश्चित समजा
तुमच्यावर कोणताही प्रसंग येवो, तुमच्या शक्तीबाहेरचा तो कधीच असणार नाही हे निश्चित समजावे. नित्य लागणाऱ्या सामर्थ्याची सोय देव तुमच्यासाठी आधीच करून ठेवीत असतो. वर्षानुवर्षासाठी लागणारी सर्व शक्ति एकदम मिळाली तर त्या भाराखाली आपण गुदमरून जाऊ. म्हणूनच तो दयामय प्रभु आपणाकडे एकामागून एक अशी हळू हळू अवघड अवघड कामे, कठिण प्रसंग पाठवितो. आपल्याला दिलेली ही देह-मन- प्राणरूपी बासरी बेसूर होऊ नये, तुटूफुटू नये म्हणून तो काळजी घेतो. देवाने पाठविलेल्या संकटांमागे केवढी मोठी शिकवण असते हे याचवेळी आपल्याला कळून येते.