इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
कितीही चुका केलेल्या असल्या तरी…
एखाद्या व्यक्तीने भूतकाळात कितीही चुका केलेल्या असल्या किंवा त्याच्यात कितीही दोष असले तरीसुद्धा, जर ती व्यक्ती ‘ईश्वरा’च्या निवासाचा दरवाजा अगदी प्रामाणिकपणे ठोठावेल तर, तिच्यासाठी तो दरवाजा कधीच बंद नसतो. मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतर्यामी असणाऱ्या ‘ईश्वरी’ तत्त्वावरील श्वेत व काळी आवरणे असतात. हे ईश्वरी तत्त्व जेव्हा कधी त्या आवरणाचा भेद करते तेव्हा, आत्म्याच्या उत्तुंगतेकडे जाताना ते तत्त्व, त्या दोन्ही आवरणांना भस्मसात करू शकते.