इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
कितीतरी वेळा हा निश्चय डळमळतो
स्वतःसाठी वा दुसऱ्यांसाठी सुद्धा ‘सुख’ हे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवू शकणार नाही. कारण, त्या सुखाचा निवास अमुक ठिकाणी आहे, तेथे ते नक्की सापडेल असे कोणी सांगू शकेल काय? आपण फक्त येवढेच निवडू शकू की चालू क्षणाचा विचार करण्यात आपण दंग होऊन बसणार की चालू क्षणी परमेश्वराची आज्ञा काय होत आहे ती पाळण्यासाठी प्रयत्नशील रहाणार. की ज्या ज्या कृती-वृत्तींनी जीवन उदात्त बनेल त्यांना व्यक्त होण्यास वाव देणार? ही निवड करून तिला चिकटून राहणे किती कठीण आहे याची आपल्याला कल्पना आहे. कितीतरी वेळा हा निश्चय डळमळतो व मन भलत्याच मार्गाने, कधीं तर उलट्याच मार्गानें विचार करू लागते. याचा अनुभव सर्वांनाच आहे. पण आपण एकदा शोधलेला आधार जर सोडून दिला, तर जीवनातील अंधारात आपणास हात धरून नेण्यास दुसरे कोणीही पुढे येणार नाही.