इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
खरेखुरे ‘तुम्ही’ व्हा!
विचार, उच्चार आणि आचार यांना जर आध्यात्मिक वळण लावाल तर ते सूक्ष्मदर्शी, अर्थपूर्ण व मधुर बनतील. बुद्धी, भावना आणि कृती यांना जर आध्यात्मिक वळण लावाल, तर जीवनास एक नवीन क्रान्ती प्राप्त होईल. आध्यात्मिक शक्ती, प्रेम व ज्ञान यामधूनच तुमची वाणी उगम पावावी. शाश्वत जीवनातील आत्मसाक्षात्काराची जी जाणीव, तिच्या पार्श्वभूमीवर राहूनच विचार करावा. दिव्य शक्तीचा ओघ सारखा वाहत आहे. अशा अंतःकरणांतून, आंतरिक जीवनांतून स्फूर्ति मिळवून त्यायोगानेच तुमची कृती घडावी. तुमच्या संकुचित जाणीवेवर सर्व भिस्त टाकू नका. आत्मसाक्षात्कारामुळे प्राप्त होणारे उत्स्फूर्त ज्ञान तुमच्या नित्याच्या, साध्यासुध्या व्यवहारातील कृतींमधून व्यक्त करा. आणि तुम्ही खरेखुरे ‘तुम्ही’ व्हा. हाच धर्म.