इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
जीवन हे एक क्रीडांगण आहे
लक्षात ठेवा, ईश्वराच्या ठिकाणी संपूर्णतया लीन होऊन गेलेले, वासनेच्या साऱ्या मागण्या आणि इंद्रियांची सारी गडबड शांत झालेली आहे, असे शुद्ध मन म्हणजे पावित्र्याची मूर्तीच असते. जीवन हे पोकळ, अर्थशून्य स्वप्न नाही तर ते क्रीडांगण असून, त्यात नेमलेला भाग प्रत्येकाने खेळला पाहिजे.
ध्यानात धरा की, प्रगती ही काळाने मर्यादाबद्ध होते. पण पूर्णत्वप्राप्ती ही अनंत कालौघात होत असते. बुद्धी आणि बाह्य जडजगत् यातील भेद हा प्रतीचा आहे, प्रकाराचा नाही.
लक्षात ठेवा, मन आणि जडजगत् यांतील भेद दिखाऊ, वरवरचा आहे आणि आज ना उद्या त्याला नाहीसे व्हावे लागेल. विश्व म्हणजे वस्तुरूप धारण केलेला प्रत्यक्ष परमेश्वरच समोर आहे.