इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…तर अशक्यही शक्य होईल
सत्यसाधना, दयाभावना आणि प्रकृतीमातेची अज्ञायांच्या समोर अशक्य हा शब्द तुम्ही उच्चारता कामा नये. बरोबरीची सर्व मंडळी थकून अशक्य म्हणून हातपाय गाळून जेथे स्वस्थ बसतील व तुम्ही एकटेच उरले असाल, तेथेच व तेव्हाच तर तुमच्या अंगच्या तेजाचे दर्शन घडणार. याचवेळी प्रयत्नांची शिकस्त करून तुम्ही अशक्यास शक्य बनविले पाहिजे. कोणाचाही सल्ला वा सहानुभूती शब्द यांची आशा न धरता साहस करून पुढे घुसले पाहिजे. कारण तुमच्यामधील सुप्त शक्ती अशाच वेळी जागृत होणार. परमेश्वरी कृपा व मार्गदर्शन मिळण्याचा सोन्यासारखा प्रसंग हाच असतो. अनंत आकाशात सुवर्णाक्षरांनी पुरुषार्थी जीवनाची रेखाटने अशाच प्रसंगी होत असते. संपूर्ण इच्छाशक्ती मागे उभी असेल तर स्वन्नोतीच्या मार्गात अशक्य असे काहीही भेटणार नाही.
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD