विचार पुष्प
शांती मिळविण्यासाठी हे कराच
आपण एखाद्या भावनेच्या आहारी जातो, आत्मसंयम सुटतो; पण सर्व वेळी व सर्व बाबतीत, येईल त्याला धिटाईने, धैर्याने तोंड देण्याचे व्रत आपण घेतले, तर आपल्याला शांतीचा व ईश सान्निध्याचा नित्य अनुभव येईल. अधीरता म्हणजे काय? जे काही आपल्यापाशी व आपल्याभोवती आहे ते दूर लोटण्यासाठी धडपडणे आणि जे काही दूर आहे, आपल्या हातचे नाहीं ते हव्यासाने ओढण्याचा प्रयत्न करणे, हीच अस्वस्थता, अशांति, अधीरता. पण या सर्व गोष्टींविषयी अलिप्त राहून त्यातील अनिष्टता कशी आपोआप विरून जाते हे तुम्ही स्वानुभवाने पाहण्याचा प्रयत्न का नाही करीत? तुम्ही विरोध करता, तिरस्कार करता व त्यायोगेच त्यांना अनिष्ट बनविता; शांती ही ‘आत’ असते, बाह्य वस्तूत ती नसते; सर्व स्वीकाराच्या व्रतानेच ती लाभते.
Vichar Pushpa How to get Peace