इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
प्रामाणिकपणा म्हणजे
संपूर्ण प्रामाणिकपणा किंवा पारदर्शक प्रामाणिकपणा म्हणजे काय? त्याबद्दल असे सांगता येईल — प्रामाणिकपणाची तुलना वातावरणाशी किंवा एखाद्या काचेच्या तावदानाशी करता येते. यांपैकी कोणतीही गोष्ट पूर्णपणे पारदर्शक असेल तर, त्यामधून कोणताही विपर्यास न होता – प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. चेतना प्रामाणिक असेल तर, दिव्य स्पंदनांमध्ये कोणतीही विकृती न येऊ देता, तिचे संक्रमण होऊ शकते.