इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
यातच खरी समृद्धी आहे
आपल्याला मिळालेले काम फारच क्षुल्लक आहे, असे कधीच म्हणू नका. तसे मानूही नका. तुमच्या दृष्टीने हातचे काम अमौलिक व सर्वात अधिक महत्त्वाचे असले पाहिजे. हाती घेतलेले प्रत्येक काम अचूक, विलंब न लावता, शीघ्र गतीने व नीटनेटकेपणाने करून तडीस न्या. तुमचे मन, तन हे संपूर्णपणे त्यात लावून करा. तुमचे कुटुंबीय आणि संबंधीजन यांच्याविषयीचे कर्तव्य पार पाडण्यात अतिदक्ष व उदार रहा. अशा तऱ्हेने सतत देण्यात तुमची समृद्धी आहे. मग भौतिकदृष्टीने तुम्ही कितीही गरीब असला म्हणून काय बिघडले. खरे दाते आणि कुशलकर्मी व्हा हाच तुमचा योग. हीच तुमची साधना. आणि हीच सिद्धी. या दृष्टीने अखिल जीवन हाच योग आहे. प्रत्येक जण अध्यात्म मार्गावरील प्रवासी साधक आहे. यादृष्टीने आपण आहोत. लहान, मोठे व बरोबरीचे आपण सर्वच सहधर्मी आहोत
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/