इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ही एकच प्रार्थना सतत मनामध्ये ठेवा
प्रत्येक व्यक्तीस एकेक कर्तव्य ठरवून दिलेले आहे. प्रत्येक व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रात असेल त्या क्षेत्रात तरी आपल्या अंतरीच्या परमेश्वराच्या संकल्प पूर्तीसाठी तिने मनापासून झटावे. असे करताना तुम्ही तुमच्याभोवती काही प्रमाणात तरी सदभाव, प्रेम, सहानुभूती, दया, अनुकंपा या सद्गुणांचे वातावरण निर्माण करू शकलात तर तुम्ही केवढे भाग्यवान्!
हे भाग्य लाभावे म्हणून तुम्ही सतत, सुखदुःख प्रसंगात, परिस्थितीशी तोंड देतांना, स्वस्थ असतांना, संवाद करतांना, उत्सव प्रसंगी किंवा एकांतात एकच एक प्रार्थना मनामध्ये सतत ठेवा : प्रभो, माझ्या जीवनाचा रागरंग दिवसानुदिवस उज्ज्वल व दिव्यतर होत रहावा. यासाठी माझ्या जीवनाचे संपूर्ण नियतृत्व तुझीच इच्छा करीत राहो. माझ्या हृदयात, तुझ्या आज्ञेच्या परिपालनाविषयी उत्साह, उत्कटता व उत्सुकता सतत असो.