इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ही गोष्ट भाग्याची तर
सुस्वभावी व समंजस माणसांच्या सहवासात आनंदाने राहता येणे ही गोष्ट भाग्याची तर खरीच पण एका दृष्टीने पाहता त्यात विशेष काय आहे? कारण, सामान्यतः माणसाला मनःशांती, प्रसन्नता आवडतेच. सुस्वभावी माणसाचे आकर्षण सर्वांनाच असते. पण दुःस्वभावी, कर्कश, कठोर व तोडाळ माणसाच्या संगतीत मनःस्वास्थ्य व शांती ठेवून राहता येणे. अव्यवस्थित, अस्वच्छ गरिबांच्या सहवासात राहतां येणें, किंवा स्वभावाने आणि विचाराने तुमच्याहून अगदी उलट्या दिशेने चालणाऱ्यांबरोबरही निभावून नेता येणे ही फार मोठी गोष्ट आहे. तुमच्यावर खरोखरीच परमेश्वरी कृपा असल्याचे ते गमक आहे. त्यातच खरा पुरुषार्थ आहे. तेच स्वागतार्ह व भूषणास्पद आहे. त्या बाबतीतच निरीक्षण करून आपापली प्रगती करून घ्या.