इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
…ही चूक करु नका
जेव्हा दुसरे कोणी तुम्हास त्रास देतात, अपमान करतात तेव्हा त्यासंबंधी सारखा विचार करून मनास गांजू नका. किंवा त्याची वाच्यता करण्याची चूक करू नका. कारण नको त्या स्पंदनांना त्यायोगे तुम्ही वातावरणात सोडता. “त्यांनी निदान माझ्याशी तरी असे वागायला नको होते. काय हा उद्घट पणा, कृतघ्नपणा, अमर्यादा! आता शहाणे, मोठे आणि सभ्य झालेत ना!” ही भाषा तुमच्या तोंडी व मनी नसावी. राग, द्वेष व मत्सर त्यायोगें वाढवू नका. सर्वच जण प्रकृतीच्या आधीन असतात. एकाच बोटीतील प्रवासी असतात. तरी नम्र व्हा. उदार व्हा. क्षमावृत्ति राखा.