इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
ही आहे खरी आध्यात्मिकता
कर्मामध्ये सुव्यवस्था आणि सुमेळ असला पाहिजे. वरकरणी पाहता जी गोष्ट अगदीच सामान्य वाटते ती गोष्टसुद्धा अगदी परिपूर्ण पूर्णतेने, स्वच्छतेच्या, सौंदर्याच्या, सुमेळाच्या भावनेने आणि व्यवस्थितपणाने केली पाहिजे. कर्मामध्ये ‘परिपूर्णते’ची आस बाळगणे ही आहे खरी आध्यात्मिकता.