इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हेच श्रेयस्कर आहे
जी जागा, समाज आणि घटनाप्रवाह तुमच्यासाठी परमेश्वराने नियोजित केला असेल त्याचा आनंदाने व न कुरकुरता स्वीकार करा.
ज्या गोष्टींशी व वस्तूंशी योगायोगाने तुम्ही संबंधित आहात त्याच्याशी जमवून घेत जा.
ज्या मानवबंधूंच्या शेजारी तुम्हास रहावयास दिले आहे त्याच्यावर मन:पूर्वक प्रेम करा. त्यांचे जीवश्चकंठश्च व्हा.
वर्तमान परिस्थितीबद्दल निराश होऊ नका. तसेंच भविष्याविषयी भय बाळगू नका.
ज्या गोष्टी जेव्हा मिळतात त्याचवेळी त्यांचा उपयोग करावा व इतर वेळी त्यांच्याशिवायच रहावे हेच श्रेयस्कर.