इंडिया दर्पण
– विचार पुष्प –
हेच माणसाला खाली खेचते
मन आणि मनाचे उद्योग यांचा प्रवेश होताच माणसामध्ये स्व-तंत्र ‘मी’पणाची, स्वामित्वाची भावना प्रविष्ट झाली, हा अहंकारच माणसाला खाली खेचतो आणि त्याला क्षुद्र व नीच बनवितो. त्याचे शिक्षण, त्याचे शोध, त्याच्या वैज्ञानिक उपलब्धी, आणि त्याचे सर्व लाभ हे सारे त्याच्या पायाशी लोळण घेत असतात.
या साऱ्या गोष्टींनी त्याला समृद्ध, सुखकर, सुरक्षित आणि निर्धोक बनविले आहे पण त्याच बरोबर त्याला उद्धट, अहं-केंद्रित आणि विकृतही बनविले आहे. या गोष्टी त्याला खराखुरा माणूस बनवू शकलेल्या नाहीत. माणसाची ही स्थिती अगदीच केविलवाणी आहे.
माणूस इतका विकृत झाला आहे की, जेव्हा तो दुसऱ्यांना फसवण्याचा आनंद घेत असतो, तेव्हा तो वास्तविक स्वतःलाच फसवत असतो आणि त्याला मात्र त्याची जाणीवदेखील नसते. किती खेदजनक आहे हे सारे. तो यावर मात करण्यास कधी बरे शिकेल?