इंडिया दर्पण – विचार पुष्प – हेच खरे जीवन
आंब्याची कोय स्वतःला जमिनीत पुरून घेते म्हणून जगाला गोड फळे चाखावयास मिळतात.
दिव्यातील तेल नाहीसे होते, वात जळून खाक होते म्हणूनच जगाला प्रकाश मिळतो.
रणांगणावर लाखो जीवांचा होम होतो आणि उरलेल्यांना स्वातंत्र्यसूर्याचें दर्शन होते.
समुद्रातील पाणी सूर्यकिरणात स्वतःस जाळून घेते आणि स्वर्गांतून, शुद्ध झाल्यावर, पृथ्वीवर उतरून आनंद आणि समृद्धी निर्मिते.
महापुरुषांनी बलिदाने द्यावी आणि सामान्यांनी त्यांच्या पुण्याईचा लाभ घ्यावा, हा एक निसर्गाचाच कायदा आहे.
आंब्याची कोय, तेलवात, सैनिक, समुद्रांतील जलकण या सर्वांच्या जीवनांतून ‘त्याग हेच खरे जीवन’ असल्याचे सत्य प्रकट होते.